बंद
    • जिल्हा न्यायालय, वर्धा संकुल

      जिल्हा न्यायालय, वर्धा संकुल

    जिल्हा न्यायायलयाबद्दल

    जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा ची स्थापना सन १९११ मध्ये झाली. सुरुवातीला न्यायालयाचे कामकाज जानकीदेवी बजाज विज्ञान व शिक्षण महाविद्यालयाच्या इमारतीपासून सुरू झाले. श्री बी बी मेहरा हे पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. सेवाग्राम रोड, वर्धा येथे १९१८ मध्ये राज्य सरकारने स्वतंत्र न्यायालयाची इमारत बांधली आणि त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय त्याच ठिकाणी स्थलांतरित झाले. नंतर याच आवारात २००४ साली जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. या नवीन इमारतीचे उदघाटन श्री दलवीर भंडारी, माननीय मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर २००४ रोजी करण्यात आले. तेव्हापासून जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा या नवीन इमारतीत कार्यरत आहे. तसेच मुख्य न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्या.प्र.श्रे.यांची न्यायालये जुन्या इमारतीत काम करत आहेत. सध्या वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, सेलू या ८ तहसील आहेत. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा न्या.प्र.श्रे..यांची न्यायालये देवळी वगळता पुलगावसह सर्व तहसीलमध्ये कार्यरत आहेत. पथदर्शी प्रकल्पाचा भाग असल्याने, ग्रामन्यायालयाची स्थापना वर्धा न्यायिक जिल्ह्यात २ ऑक्टोबर २००९ रोजी म्हणजेच महात्मा गांधी जयंती रोजी करण्यात आली. श्री एस ए बोबडे, माननीय न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या हस्ते आणि श्री सी.एल. पांगारकर, माननीय न्यायमूर्ती व पालक न्यायाधीश, वर्धा जिल्हा, उच्च न्यायालय, मुंबई. यांच्या उपस्थितीत ग्रामन्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या महात्मा गांधींच्या आश्रमाच्या आवारात सेवाग्राम[...]

    अधिक वाचा
    श्री देवेंद्र कुमार उपाध्याय
    मुख्य न्यायमुर्ती उच्च न्यायालय, मुंबई माननीय श्री देवेंद्र कुमार उपाध्याय
    Smt. U. S. JOSHI- PHALKE, J.
    पालक न्यायमुर्ती वर्धा जिल्हा माननीय न्यायमूर्ती श्रीमती. यू.एस. जोशी- फाळके
    Shri S J Bharuka
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा श्री. संजय जे. भारुका

    कोणतीही पोस्ट आढळली नाही

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा